ठाणे : सी सर्व्हेच्या अहवालावर खडसे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगतले की, महाविकास आघाडीला लोकसभेत चांगल्या जागा म्हणजे चाळीत ते चौवेचाळीस जागा मिळतील अस समोर आले आहे. राज्यात ती सद्यपरिस्थिती आहे त्यावर आधारित असा हा सर्व्हे आहे. सध्याच राज्य सरकार अस्थिर असून सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर सरकार अवलंबून आहे. हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यात समन्वय नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना केवळ सत्तेच्या लालसेसाठी पक्ष फोडणे सर्वांना एकत्र करणे हा खटाटोप करण्यात आला.
राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज :खडसे पुढे म्हणाले कि, राज्यात सध्या बेरोजगारी महागाई असून उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही. म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाही असेच दिसून येते. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीमध्ये सामील होणार की नाही? याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणेही झाले नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसा प्रस्ताव आला तर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.