ठाणे: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात हिल लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. यासाठी कोपरी पोलीस ठाण्यात जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सहीचे निवेदन दिले. दरम्यान, यावेळी प्रदेश चिटणीस मा. नगरसेवक सुहास देसाई यांनी, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाला माॅर्फ करून चिथावणी दिली जात आहे. आता न्याय मागण्यासाठी तसेच असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
सोशल मिडीयावर व्हिडिओ: परांजपे यांनी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये शनिवार दिनांक 27 मे, 2023 रोजी नेताजी चौक, उल्हासनगर येथे पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ मॉर्फ करुन तो सोशल मिडीयावर पसरवून त्यांची नाहक बदनामी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी शंकर मंदिर हॉल, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, रमाकांत पाटील, दिपक घनश्यानी, हरेश तोलानी, भाजपा युवा मोर्चाचे ओमकार चव्हाण यांनी बैठक घेतली.
शहरातील सिंधी बांधवांमध्ये माॅर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा - जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे