ठाणे- सलग तिसऱ्या दिवशी सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने आता डांबरी रस्तेदेखील खचत चालले आहेत. ठाणे महापालिकेच्यावतीने घोडबंदर येथील कावेसर येथे ड्रेनेजचे काम काही महिन्यापूर्वी केले होते. त्याच परिसरातील 3 ठिकाणी नवीन स्वरूपात काम करण्यात आलेले डांबरी रस्ते 5 ते 6 इंच खचले आहेत. त्यामुळे पालिकेने केलेल्या कामांची पोलखोल झाली आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
पहिल्याच पावसात ठाणे शहरातील डांबरी रस्ते खचले; राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी - ठाणे
ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने हे काम केले असून हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे, याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हीजेटीआय अथवा आयआयटीमार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
घोडबंदर पट्ट्यात झालेल्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे. घोडबंदर आणि सेवा रस्ता खचण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्या संदर्भात हे निवेदन देण्यात आलं आहे. घोडबंदर परिसरातील सेवा रस्त्यावर जवळपास ३० किलोमीटर लांबीचे मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कावेसर, न्यू होरायझन स्कूल, ब्रह्मांड सिग्नल ते आझादनगर परिसरातील रस्ते खचले आहेत. पावसाळ्याआधीच ५ किलोमीटरचा हा रस्ता खचला आहे.
ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने हे काम केले असून हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे, याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हीजेटीआय अथवा आयआयटीमार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चरची चौकशी करून त्याची लेखी स्वरूपात माहिती जाहीर करावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे.