ठाणे- जनसामान्यांचा ज्या टोरंटला विरोध आहे. त्या टोरंटला सरकारकडून कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न आम्ही उधळून लावू, जनसुनावणी घेऊन जनसामान्यांचे ऐकून घेऊ. मात्र, टोरंटला जोरजबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तरही तसेच दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
टोरंटविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; जबरदस्तीने टोरंट लादल्यास जबरदस्तीनेच परत पाठवू - जितेंद्र आव्हाड
जनसामान्यांचा ज्या टोरंटला विरोध आहे. त्या टोरंटला सरकारकडून कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरात वीज वितरणाचे खासगीकरण करुन टोरंट कंपनी लादली जात आहे. त्या विरोधात राष्ट्रवादीने एल्गार पुकारला आहे. कळवा-मुंब्रा-शीळमधील वीज ग्राहकांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरेंट पॉवर कंपनीला या परिसरातील वीज वितरणाचे हक्क पुढील 20 वर्षांसाठी देण्यात आले आहेत.
या परिसरातील वीज वितरणाचे खाजगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून या नागरिकांकडून या खासगीकरणाला विरोध केला जात होता. मात्र, खासगीकरणाला होणारा विरोध डावलून महावितरणने शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीज वितरणाचे काम टोरेंट पॉवर कंपनीला दिले. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 24 जूनपर्यंत जर टोरंटचा ठेका रद्द करण्यात आला नाही तर 25 जून रोजी कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आला आहे.