नवी मुंबई - एपीएमसी सेक्टर 11 येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा सांगाडा आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत फक्त 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे.
27 डिसेंबरला एपीएमसी परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पुरुषाचा कुजलेला मृतदेह (सांगाडा) आढळून आला होता. या घटनेची एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले. पोलिसांनी जवळपास असणाऱ्या झोपडपट्टीमधील लोकांना विश्वासात घेतले व अधिक चौकशीत पारू नावाची महिला झोपडी सोडून गेल्याची माहिती मिळाली. विविध ठिकाणी शोध घेल्यानंतर अखेर ती सापडली.
प्रेमप्रकरणातून खून : कचऱ्याच्या ढिगाखाली आढळला मृतदेह प्रेमसंबंधातून पारूला गेले दिवस
पारू या महिलेचा पती प्रविण नायर(50) मृत असल्याची माहिती समोर आली. तो नेहमी तिच्यासोबत भांडण करत असे. त्यापासून पारूला 6 वर्षांचा मुलगा आहे. दरम्यानच्या काळात पारूने प्रविणला सोडले व तिचे प्रेमबहादूर सावन(49) नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले. ती प्रेमसोबत राहू लागली. या दोघांना 4 वर्षांचे मूल देखील आहे. पारू या महिलेचा पहिला पती व प्रियकर दोघेही परिचयाचे असून ते दोघे ती वास्तव्यास असलेल्या ठिकाणी एकत्र मद्यपान करत.
नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद
दिवाळीनंतर रात्री उशिरापर्यंत हे दोघेही घरी दारू पिण्यास बसले असता त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे प्रेम बहादूर याने प्रदीप नायर याला प्रचंड मारहाण केली व त्याचा खून केला. तसेच त्याला प्लास्टिकच्या बॅनरमध्ये लपेटून कचऱ्याच्या ढिगाखाली टाकले. पारूला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. तसेच राहती झोपडी सोडून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करण्यास सांगितले. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच एपीएमसी पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या 24 तासात त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.