ठाणे -राजधानी दिल्लीमध्ये जी हिंसा झाली, त्यात 38 जणांचा बळी गेला आहे. या हिंसेला भाजप नेते परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा आणि एमआयएमचे वारिस पठाण जबाबदार असून त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच हे घडले असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्यामुळे या चौघांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलन.... हेही वाचा...वारिस पठाणांच्या चिथावणीखोर भाषणाला आम्ही 'असे' देणार उत्तर.. एक सच्चा भारतीय
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी 23 फेब्रुवारीला मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ सीएए समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीत मिश्रा यांच्यासह अनुराग ठाकूर, कपील मिश्रा यांनी प्रक्षोभक विधाने आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. तर एमआयएचे नेते वारिस पठाण यांनी 15 कोटी मुस्लीम 100 कोटींना भारी पडतील, असे विधान केले होते. या विधानांमुळेच दिल्लीत हिंसाचार भडकला असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
त्यामुळेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर मानवी साखळी धरुन निदर्शने करण्यात आली. यावेळी परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा, वारिस पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करा. हिंसा नको, शांतता हवी अशा घोषणा देण्यात आल्या.
हेही वाचा...'तिकडून शरद पवार येताहेत म्हटल्यावर इकडून मी येणारच'
यावेळी प्रसारमाध्यमांशी शानू पठाण यांनी; परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा, वारीस पठाण यांच्यासारख्या लोकांमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण केले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच येथील मुस्लीम हा देशप्रेमी आहे. मात्र हे लोक त्यांना बदनाम करत असल्याचे म्हटले आहे.
परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे आदेश हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. मात्र, गुन्हे दाखल करण्याऐवजी आदेश देणार्या न्यायाधीशांचीच बदली केली जात आहे. ही हुकूमशाही सहन केली जाणार नाही, असा इशाराही पठाण यांनी यावेळी दिला. या आंदोलनात नगरसेवक अशरफ शानू पठान, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, सामान्य नागरिक सहभागी झाले होते.