महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

कल्याण पोलिसांनी एका ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या (9 year old girl tortured and killed) करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. (murderer of 9 year old girl arrested). घटना घडल्यानंतर १४ दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आरोपीला यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनेत १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाल्याचे उघड झाले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 15, 2022, 10:31 PM IST

दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात एक विकृत घटना घडली आहे. येथे एक ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईच्या कुशीत झोपली असताना ३२ वर्षीय नराधमाने तिचे अपहरण केले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करून तिची गळा चिरून निर्घृण हत्या केली. (9 year old girl tortured and killed). या नराधमाचा १४ दिवस शोध घेऊन त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. (murderer of 9 year old girl arrested). ही घटना १ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. सुरज शंकर सिंग उर्फ विरेंद्र शंकर मिश्रा वय ३२ रा. भिवंडी, असे अटक केलेल्या नराधमाचे नाव असून त्याला अटक केल्यानंतर त्याने पूर्वीही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

असा घडला गुन्हा : कल्याण रेल्वे स्थानकानजीक एका बिल्डींग समोरील फुटपाथवर पीडिता आईवडिलांसह झोपली होती. त्यावेळी आरोपीने पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास तिचे झोपेत असतानाच अपहरण केले. त्याने तिला लगतच्या सोसायटीच्या आवारातील मागील बाजूस नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवेगळे १० पोलीस पथके स्थापन : हा गुन्हा अतिशय गंभीर व संवेदनशील असल्याने जिल्ह्यातील सर्व गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या गेल्या. अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांनी वेगवेगळे १० पोलीस पथके स्थापन करून तपास पथकांना तपासाबाबत वेळोवेळी योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते.

सीसीटीव्ही फुटेजमुळे पटली आरोपीची ओळख : तपास पथकांनी सीएसटी ते कर्जत, कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक, सदर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसर, कल्याण पूर्व व पश्चिम, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पूर्व व पश्चिम, कर्जत, शहाड, आंबिवली, टिटवाळा, बनेली झोपडपट्टी, कळवा झोपडपट्टी, मुंबा पुर्व व पश्चिम परिसरातील झोपडपट्टी, डोंबिवली, भिवंडी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयीत आरोपीचा फोटो व फुटेज प्राप्त करून आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेलमधुन सुटलेले गुन्हेगार यांची माहिती मागवून त्याद्वारे आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.

सोनाळे गावातून आरोपीस अटक :महात्मा फुले चौक पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनिय बातमीदारा कडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात एका चाळीत राहतो आहे. तो मूळचा मध्यप्रदेश राज्यातील असल्याची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाली. त्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे एक पथक मध्यप्रदेशातील आरोपीच्या मूळ गावी गेले. आरोपीचे मूळ गाव तसेच भिवंडी परिसरातील राहण्याचे ठिकाण या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबवून त्याला पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातून १५ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या आधी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा : आरोपीला यापूर्वी देखील बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाल्याचे चौकशीत उघड झाले. तसेच त्याने सोनाळे परिसरात स्थानिक रहिवाशांच्या बकरी सोबत अंधाराचा फायदा घेऊन अनैसर्गिक दुष्कृत्य केल्याची माहीती देखील समोर आली आहे.

२३ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी :या गंभीर गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना केवळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसेच गोपनिय बातमीदार व वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील आरोपीची माहिती संकलित करून पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. आज आरोपीला विशेष न्यायालय तथा अप जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला २३ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details