महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीमध्ये मजुराची हत्या, आरोपी फरार - भिवंडी लेटेस्ट न्यूज

केळीच्या वखारीत काम करणाऱ्या एका मजुराची तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून, निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील पटेल कंपाऊंड परिसरात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नारपोली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

भिवंडीमध्ये मजुराची हत्या, आरोपी फरार
मजुराची हत्या, आरोपी फरार

By

Published : Mar 23, 2021, 7:33 PM IST

ठाणे -केळीच्या वखारीत काम करणाऱ्या एका मजुराची तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून, निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील पटेल कंपाऊंड परिसरात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नारपोली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सीताराम राममिर्ची यादव (वय 35, उत्तर प्रदेश ) असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे.

वखारीत काम करणाऱ्या मजुरांची चौकशी

भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील भैय्यासाहेब आंबेडकर नगर मधील रस्त्यावर एक केळ्याची वखार असून, येथे कच्ची केळी पिकून घाऊक विक्री करण्याचे मोठे गोदाम आहे. या वखारीत सिताराम हा इतर कामगाराप्रमाणे मजुरीसह हमालीचे काम करत होता. सोमवारी रात्री आपले काम संपवून सिताराम त्याच गोदामात झोपला होता. दरम्यान मंगळवारी मध्यरात्री त्याची अज्ञात इसमाने निर्घुण हत्या केली. या घटनेची माहिती आज सकाळच्या सुमारास नारपोली पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दखल करण्यात आला आहे. दसरीकडे वखारीत काम करणाऱ्या मजुरांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र घटनेला 12 तास उलटून देखील या मजुराची हत्या का करण्यात आली, याचा शोध लागलेला नाही.

हेही वाचा-विशेष : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेची तसेच ३० टक्के इंधनाची होणार बचत

ABOUT THE AUTHOR

...view details