मीरा भाईंदर -काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हटकेश परिसरात रविवारी सायंकाळी मारुती सुझुकी ब्रिझाला एका दुचाकी चालकाने कट मारली. त्यानंतर कट मारणारा दुचाकीस्वार तेथून पळून गेला. मात्र, याप्रकारमुळे एका १८ वर्षीय मुलाचा निष्पाप बळी गेला आहे. शुभम भुवड (१८) मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. दरम्यान, या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 3 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
टीशर्ट लाल असल्याच्या संशयावरून केली मारहाण -
रविवारी सायंकाळी हटकेश परिसरात एका चारचाकी आणि दुचाकी चालकामध्ये वाद झाला. यामध्ये दुचाकीवर असलेल्या तीन मुलांनी एकसारखे लाल रंगाचे टीशर्ट परिधान केले होते. चारचाकी चालक जतीन उपाध्याय वाद झाल्यानंतर घरी गेला आणि वडील विनोद उपाध्यय यांना घटना सांगितली. तत्काळ ७ ते ८ मुले घेऊन ते घटनास्थळी गेले. यावेळी ते तीन मुलांचा शोध घेत होते. मात्र, त्याठिकाणी एक मुलगा लाल रंगाचे टीशर्ट घालून उभा होता. हाच मुलगा असल्याची माहिती जतीन यांनी दिली. त्यानंतर विनोद उपाध्याय याने त्याला मारहाण केली. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. त्याला उपाचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यााच मृत्यू झाला. दरम्यान, टीशर्ट लाल असल्याच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यात आली माहिती पोलिसांनी दिली आहे.