ठाणे- पैशाच्या वादातून भावोजीने डोक्यात हातोडा घालून मेहुण्याची निर्घृण हत्या केली आहे. बदलापूर पूर्वेकडील समर्थ नगर भागतील शिवनेरी इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाकर वायाळ असे मृत मेव्हण्याचे तर अमर विश्वकर्मा असे भावोजीचे नाव आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! पैशांच्या वादातून मेहुण्याची डोक्यात हातोडा घालून हत्या - ठाणे हत्या बातमी
बदलापूर पूर्वेकडील समर्थ नगर भागातील शिवनेरी इमारतीमध्ये दोघेही राहतात. दोघांचा इलेक्ट्रिक वायरिंगचा भागीदारीत व्यवसाय आहे. अमर विश्वकर्मा व त्याचा मेहुणा प्रभाकर वायाळ या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते.
हेही वाचा-चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड, तर मुंबईची जबाबदारी मंगलप्रभात लोढांवर कायम
बदलापूर पूर्वेकडील समर्थ नगर भागातील शिवनेरी इमारतीमध्ये दोघेही राहतात. दोघांचा इलेक्ट्रिक वायरिंगचा भागीदारीत व्यवसाय आहे. अमर विश्वकर्मा व त्याचा मेहुणा प्रभाकर वायाळ या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. मात्र, या वादाचे रुपांतर आज हाणामारीत झाले. यावेळी अमर विश्वकर्माने प्रभाकरच्या डोक्यात हातोड्याने हल्ला केला. यात प्रभाकरचा जागीच मृत्यू झाला. तर हाणामारीत अमर विश्वकर्माही जखमी झाला असून त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.