नवी मुंबई - कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शहरातून मोठ्या प्रमाणावर गावी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. एसटी व इतर बससेवा बंद झाल्याने लोकं मिळेल त्या वाहनांनी गावी जात आहेत. त्यामुळे कळंबोली कामोठे येथून सुरू होणारा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शाळा व ऑफिस बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक गावी जात असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. त्याच अनुषंगाने लोकं घराबाहेर पडू नयेत म्हणून कळंबोली येथील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग पोलिसांनी बंद करुन टाकला असून मुंबई व पुण्याच्या दिशेने होणारी वाहतूकही बंद करण्यात आली आहे.