महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलूंड पोलिसांनी ६९ किलो गांजासह दोघांना केली अटक

मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर परिसरात ६९ किलो गांजासह दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पकडलेल्या गांजाची अंदाजे किंमत ७ लाख इतकी आहे.

मुलूंड पोलिसांनी ६९ किलो गांजासह दोघांना केली अटक

By

Published : Jun 29, 2019, 9:40 PM IST

ठाणे- मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर परिसरात ६९ किलो गांजासह दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पकडलेल्या गांजाची अंदाजे किंमत ७ लाख इतकी आहे. दरम्यान, एतक्या मोठ्या प्रमाणात गांजा मुलूंड परिरसरात कसा आला याचा शोध पोलीस घेत आहेत.

या विषयाची माहिती पोलीस अधिकारी...

ठाण्यामधून २७ जून रोजी गांजाची विक्री करण्यासाठी दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रवींद्र विरंजन (वय २७) आणि मनोज बेनूदर ( वय २५) याला अटक केली आहे. दोघांनीही आपण या परिसरात गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे.

सुरुवातीला पोलिसांना अंगझडतीत १२ किलो ५०० ग्रॅम इतका गांजा आढळला. तेव्हा पोलिसांनी अधिक तपासणी केली असता, आरोपींनी एका ठिकाणी तब्बल ५६ किलो ५०० ग्रॅम गांजा लपवून ठेवला होता. तेव्हा पोलिसांनी हा गांजा जप्त केला. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details