महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shrikant Shinde On Sanjay Raut : संजय राऊत स्किझोफ्रेनियासारख्या आजाराने ग्रस्त - श्रीकांत शिंदे - Shrikant Shinde ridiculed Sanjay Raut allegation

खासदार श्रीकांत शिंदेंनी माझी हत्या करण्याची सुपारी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावर ते म्हणाले की, मला संजय राऊत यांची मला काळजी वाटते, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.

Shrikant Shinde On Sanjay Raut
Shrikant Shinde On Sanjay Raut

By

Published : Feb 23, 2023, 5:51 PM IST

श्रीकांत शिंदेंची संजय राऊतांवर टीका

ठाणे :ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुखमंत्र्याचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. खासदार श्रीकांत शिंदेंनी माझी हत्या करण्याची सुपारी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले कि, मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. असे बोलून खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोपाची खिल्ली उडवली आहे.

संजय राऊतांमुळे राज्याची करमणुक : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, संजय राऊत रोज सकाळी उठून कोणावरही आरोप करतात. मी डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांचे वागणे पाहून मला आश्चर्य वाटते. ते स्किझोफ्रेनियासारख्या आजाराने ग्रस्त आहेत का? ते एका काल्पनिक, आभासी जगात राहतात. महाराष्ट्राला संजय राऊतची गरज आहे कारण ते सकाळी महाराष्ट्राचे मनोरंजन करतात. त्यामुळे त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार राऊता यांची केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्राचीन शिवमंदिरासह विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आरोप निराधार असल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. यावेळी अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

माझ्यावरील आरोप हास्यास्पद :तब्बल दोन दिवसांनंतर संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपावर अखेर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडले आहे. डॉ. शिंदे म्हणाले की, माझ्यावरील आरोप हास्यास्पद आहेत. नरेश म्हस्के यांनी पुराव्यानिशी बोलले आहेत. संजय राऊतचा सहकारी चिंदरकर याचीही पोलिसांनी चौकशी केली. मारण्यासाठी सुपारी दिल्याचे प्रथम राऊत यांनी सांगितले. मात्र नंतर, काळे फासणार असल्याचे उत्तर दिले. चिंदरकर यांनी त्यांच्या उत्तरात मी कोणाचेही नाव घेतले नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे दोन्ही उत्तरांमध्ये विरोधाभास असल्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

राजा ठाकूरला सुपारी दिल्याचा गंभीर आरोप : खासदार संजय राऊत यांनी राजा ठाकूर यांना मारण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. खासदार राऊत यांनी गृहराज्यमंत्री आणि ठाणे पोलिस आयुक्तांनाही तसे पत्र पाठवले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याशिवाय राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनीही संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा -Pawan Khera Arrested: काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना अंतरिम जामीन, आसाम पोलिसांनी केली होती अटक

ABOUT THE AUTHOR

...view details