ठाणे -यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार अशी होणार आहे. आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटना पाठीशी असल्याने यावेळी पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येईन, असे वक्तव्य खासदार राजन विचारे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यातील निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असे दिसत आहे.
यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार - राजन विचारे - लोकसभा निवडणूक
लोकसभा युतीचा उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात वातावरण तापलेले आहे. यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार अशी होणार आहे. असे विधान करून त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना डिवचले आहे.
लोकसभा युतीचा उमेदवार म्हणून घोषणा होताच त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात वातावरण तापलेले आहे. यंदाची निवडणूक शिवसेना विरुद्ध गद्दार अशी होणार आहे. असे विधान करून त्यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना डिवचले आहे. दुसरीकडे मात्र मनसेची साथ आणि राजन विचारे विरोधी ठाणे महापालिकेचे २३ भाजप नगरसेवक आहेत. त्यांच्यामुळे विचारे यांना वाटणारी निवडणूक वाटते तितकी सोपी नसल्याचे चित्र सध्या ठाण्यात निर्माण झाले आहे. भाजप नगरसेवकाविरोधात दाखल केलेले गुन्हे. तसेच आपल्या नातेवाईकांसाठी भाजप नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे ठाणे लोकसभा निवडणुकीत राजन विचारे विरुद्ध नाराज भाजप नगरसेवक अशी लढत होणार असल्याचेही बोलले जात आहे.