ठाणे -बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी उद्घाटन केलेलं आणि धर्मवीर आनंद दिघे ( Dharmaveer Anand Dighe ) यांचे स्वप्न असलेले गडकरी रंगायतन ( Gadkari Rangyatan ) हे आज बिकट परिस्थितीत असल्याचा दृश्य समोर येत आहे. या प्रेक्षागृहाची नीट देखभाल न केल्यामुळे या प्रेक्षागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे प्रेक्षागृहामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना या उंदरांमुळे त्रास होत आहे. प्रेक्षागृहात नाटक बघायला आलेल्या अनेक प्रेक्षकांच्या पायांना उंदरा चावा घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दोन व्यक्तींना चावला उंदीर - गडकरी रंगायतनमध्ये नाटक पाहण्यास आलेल्या दोन व्यक्तींच्या पायाला उंदरांनी चावा घेतला आहे. सदर घटनेची बाब कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्याला विचारले असता उद्धटपणे वागणूक देत त्यांना उडवाउडवीची उत्तर मिळाली. सदर अधिकाऱ्याने पीडित व्यक्तींना सिविल रुग्णालयात जाऊन उपचार करण्यासाठी सांगितले. मात्र, गडकरी रंगायतन प्रेक्षागृहात तीन प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेतलेले नाही. पीडित महिलेने मुख्यमंत्र्यांना देखील उंदराचा चावा झाल्यास त्यांना देखील सिविल रुग्णालयात दाखल होण्यासाठी सांगाल का असा थेट सवाल विचारला आहे. सदर प्रेक्षागृहाच्या मंचावर देखील उंदरा असल्याची धक्कादायक बाब दिसून येत आहे. देखील येणाऱ्या मान्यवरांना देखील याबाबतीत त्रास होण्याची शक्याता आहे. त्यामुळे येत्या काळात मान्यवरांना जर दुखापत झाली तर गडकरी रंगायचं प्रशासन कशाप्रकारे या संपूर्ण बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.