ठाणे - राज्यातील चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. भाजप-शिवसेना महायुतीने प्रचाराचा जोर लावला आहे. मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरकरांची मने जिंकण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाऊन बाईक रॅली, प्रचारफेऱ्या काढल्या. अशाप्रकारे प्रतिस्पर्धी उमेदवाराला जोरदार टक्कर देण्यासाठी महायुतीने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती.
रणधुमाळी लोकसभेची : श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघरमध्ये बाईक रॅली
हे. घाटकोपरमधील झोपडपट्टय़ा, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या घरी जाऊन तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन प्रचार करण्यात येत आहे.
बाईक रॅली, पदयात्रा तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालये, चहाचे स्टॉल्स व उद्यानेदेखील पिंजून काढली जात आहेत. बाईक रॅलीला तरुणांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपरमधील झोपडपट्टय़ा, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या घरी जाऊन तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन प्रचार करण्यात येत आहे. विकासकामांसाठी महायुतीच्याच उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.
या मतदारसंघात भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेवकांची विकासकामे प्रचंड आहेत. पाण्याची समस्या, डोंगराळ भाग कचऱ्याचा प्रश्न या मतदारसंघात अनेक वर्षांपासूनचा आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यात भाजपचा हातखंडा आहे. दरम्यान, येथील जनतेला विकासकामेच हवी आहेत. या विकासकामांनाच मतदार मत देणार आहेत. केवळ वाचाळ बडबड न करता रेल्वेचा तसेच पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणाऱ्यांच्याच पाठीशी आपण उभे राहू, असे सांगताना प्रत्येक मतदार दिसत आहे. आजच्या बाईक रॅलीमध्ये तरुणाईचा उत्साह पाहिला की पुन्हा महायुतीचाच खासदार दिल्लीत जाणार याबाबत आता कुणाच्या मनात शंका राहिलेली नाही, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.