महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेना गावामधून सुमारे पन्नास लाखांचा गुटखा जप्त, काशिमीरा पोलिसांची कारवाई

चेना गावात एका गोडावूनमध्ये काशिमीरा पोलिसांनी सापळा रचून 49 लाख 37 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

गुटखा
गुटखा

By

Published : Oct 28, 2020, 9:14 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) -शहरातील अनैतिक उद्योगांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. चेना गावात एका गोडावूनमध्ये काशिमीरा पोलिसांनी सापळा रचून 49 लाख 37 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गेल्या महिन्याभारत गुटका, जुगाराचे अड्डे, स्पा पार्लर, पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र काशिमीरा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा माफिया सक्रिय आहेत. याबाबत अनेक तक्रारी देखील पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. गुजरातमधून येणारे गुटख्याचे कंटेनर काशिमीरा परिसरातून मुंबई तसेच ठाण्याच्या दिशेने जात असतात. त्यामुळे गुटख्याची वाहतुकीचे केंद्र वर्सोवा नाका हे झाले आहे. यापूर्वीही 90 लाखांपेक्षा अधिकचा गुटखा मीरा भाईंदरमधून जप्त करण्यात आला आहे. गुटख्याची विक्री करणारे तसेच गुटखा माफियांचे मोठे जाळ पसरलेले आहे. यामध्ये काही पोलीस अधिकारी व कर्मचारीही सामील असल्याची चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना प्रत्येक पान पट्टीमध्ये खुलेआम गुटखा विकला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने काशिमीरा, मीरारोड, नया नगर, नवघर रोड, बीपी रोड, भाईंदर पूर्व, भाईंदर पश्चिम भागात सर्व ठिकाणी गुटखा खुलेआम विकला जात आहे. काशिमीरा पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटख्यावर कारवाई केली. मात्र, हा गुटखा जिल्ह्यात येईपर्यंत पोलीस काय करतात, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे.

हेही वाचा -600 वाहतूक पोलिसांवर ठाण्याची भिस्त, कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक

ABOUT THE AUTHOR

...view details