ठाणे -वागळे आगाराकडे येणाऱ्या टीएमटी बसचा स्थानिक रहिवाश्याला धक्का लागल्याने संतप्त जमावाने टीएमटी चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. जमावाने बसची काच फोडून चालकाला दगड व रॉडने मारहाण केली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपी सूरज उर्फ बबलू गुप्ताला (वय.30) अटक केली आहे.
वागळे आगाराबाहेर टीएमटी चालकाला मारहाण - bus stand
वृंदावन सोसायटी-वागळे आगार या मार्गावर धावणाऱ्या टीएमटी बसची धडक आगाराबाहेरील रिक्षाला लागली. या रिक्षाचा धक्का लागून स्थानिक व्यक्ती खाली पडल्याने संतप्त जमावाने टीएमटी बसचा चालक राहुल धनगर (25) यांना केबिनकडील काच फोडून बाहेर काढले आणि मारहाण केली.
वृंदावन सोसायटी-वागळे आगार या मार्गावर धावणाऱ्या टीएमटी बसची धडक आगाराबाहेरील रिक्षाला लागली. या रिक्षाचा धक्का लागून स्थानिक व्यक्ती खाली पडल्याने संतप्त जमावाने टीएमटी बसचा चालक राहुल धनगर (25) यांना केबिनकडील काच फोडून बाहेर काढले आणि मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली. त्यांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टीएमटी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने केली आहे.