ठाणे -आजपासून (दि. 16 नोव्हेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्याचा मुहूर्त साधून मनसेने अनेक मंदिरात आरती केली. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात देखील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे नेते अभिजीत पानसे, शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काकड आरती केली. यावेळी राज्यभरातील भाविकांनी राज ठाकरे यांच्याकडे मंदिर उघडण्यासाठी साकडे घातले होते. सरकारने उशिरा का होईना पण सरकारने चांगला निर्णय घेतला, असे म्हणत अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव यांनी सरकारचे आभार मानले.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात अनेक पक्षांकडून मंदिरे उघाडण्यासाठी आंदोलन झाली. भाजपने दारूची दुकाने सुरु आणि मंदिर बंद, असे म्हणत राज्यभर आंदोलन केले शेवटी राज्य सरकारने याबाबत निर्णय घेत मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम