ठाणे- अंबरनाथमधील बिल्डर पटेलच्या सांगण्यावरून मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची धारदार हत्याराने भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. यामुळे पाटील यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी व्यवसायिक वर्चस्वाच्या वादातून 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी, मनसेच्या जिल्हाध्यक्षांच्या आरोपामुळे याप्रकरणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.
- दोन तासातच पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
राकेश पाटील यांच्या हत्येप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात डी. मोहन, भरत पाटील, विनायक पिल्ले, अख्तर खान, विजय दासी, राजू दासी, रमेश दोहार व त्यांच्या इतर 2-3 साथीदारांवर गुन्हा दाखल करून या आरोपींचा शोध सुरू केला होता. दोन तासातच मारेकरी अंबरनाथहून मुरबाडच्या दिशेने एका गाडीतून पळून जात असताना पोलिसांनी नाकेबंदीद्वारे चार आरोपींना अटक करत शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
- 'असा' झाला राकेश पाटील यांचा खून
अंबरनाथ शहरातील पालेगाव परिसरात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. याच परिसरात जैनम सोसायटीचे काम सुरू असून त्या ठिकाणी काही कामानिमित्त काल (दि. 28 ऑक्टोबर) सायंकाळी राकेश पाटील गेले असता यांच्यावर 6 ते 8 जणांच्या टोळक्याने धारदार हत्यारांनी हल्ला केला. यावेळी पाटील यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. जखमी अवस्थेत पाटील यांना तत्काळ कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
- मनसे जिल्हाध्यक्षकांनी केले 'हे' आरोप