नवी मुंबई- मनसेच्या शॅडो कॅबिनेटची आज स्थापना करण्यात आली. याद्वारे सरकारच्या मंत्रिमंडळाने केलेल्या कामावर नजर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वित्त नियोजन नितीन सरदेसाई, वसंत फडके, पियुष छेडा आणि वल्लभ चितळे यांच्याकडे देण्यात आले आहे, तर वन मंत्रालयाच्या कामावर संजय चित्रे, अमित ठाकरे, वगिश सारस्वत, ललित यावळकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या कामावर अमितची नजर - पर्यटन मंत्रालय अमित ठाकरे
आज मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर झाले आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन खात्यावर अमित ठाकरेंची नजर असणार आहे.
आदित्यच्या कामावर अमित ठाकरेंची नजर
'असे' आहे मनसेचे शॅडो कॅबिनेट -
- वित्त नियोजन - नितीन सरदेसाई, वसंत फडके, पियुष छेडा, वल्लभ चितळे
- ऊर्जा मंत्रालय - शिरीष सावंत, सागर देवरे, ऊनी भोईटे, जय प्रकाश बाविस्कर, प्रेश चसुधारी, अनिल शिदीरे
- वनमंत्रालय - संजय चित्रे, अमित ठाकरे, वगिश सारस्वत, ललित यावळकर
- शिक्षण खाते - अभिजित पानसे,,आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, बिपीन नाईक, अमोल रोगये
- कामगार खाते - राजेंद्र वागजर, सुरेंद्र सुर्वे,
- नगरविकास व पर्यटन खाते - संदीप देशपांडे, अमित ठाकरे, उत्तम संदव, योगेश चिले
- आरोग्य खाते - रिता गुप्ता, कुंदा राणी
- सहकार मंत्रालय - दिलीप धोत्रे, वल्लभ चितळे
- अन्न व पुरवठा मंत्रालय - राजा चौगुले, वैभव माळवे
- मत्स्य पालन खाते - जितू चव्हाण
- महिला व बालविकास मंत्रालय - शालिनी ठाकरे
- बांधकाम खाते - अभिषेक सप्रे, संजय शिरोडकर
- रोजगार खाते - बाळा शेडगे
- सांस्कृतिक मंत्रालय - अमेय खोपकर
- कृषी मंत्रालय - संतोष नागरगोजे
- कौशल्य विकास - स्नेहल जाधव
- सामाजिक न्याय - गजानन काळे, संतोष सवलत
- ग्राहक संरक्षण - वसंत फडके
- आदिवासी विकास - आनंद एमनाद्वार
- पर्यावरण मंत्रालय - रुपाली पाटील
- खारजमिनी - अनिशा माजगावकर
- क्रीडा -विठ्ठल लोकणकर
- अल्पसंख्याक - इरफान शेख, जालीम तडवी, अल्ताफ खान