महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Rape Case : बाप लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बापाची आत्महत्या

Minor Girl Rape Case: एका ४० वर्षीय नराधम बापाने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Father abuses daughter) बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम येथे घडली. नराधम बापाविरोधात अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल होत असतानाच आरोपी बापाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आहे.

Minor Girl Rape Case
मुलीवर अत्याचार करून बापाची आत्महत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 4:10 PM IST

ठाणेMinor Girl Rape Case:मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची ३१ वर्षीय आई आणि आरोपी बापाचा काही वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. पीडितेची आई काबाड कष्ट करून दोन मुलांसह संसार सांभाळत होती. मात्र, रिक्षाचालक आरोपी नवरा हा संसाराकडे दुर्लक्ष करायचा. याच कारणाने नवरा बायकोमध्ये सतत वाद व्हायचे. या वादामुळे पीडितेची आई मागील एक ते दीड वर्षांपासून दुबईला कामानिमित्त राहत होती. मात्र, दुबईला जाताना आईने आपल्या दोन मुलांची जबाबदारी आरोपी नवऱ्यावर सोपविली होती. (abusive father commits suicide)

आजीकडे गेल्याने फुटले बिंग :पीडितेची आई दुबईत काम करत असल्याचा फायदा घेत आरोपी बापाने २६ जुलै २०२२ ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केला. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आजीकडे सणांच्या निमित्ताने राहायला आली असता ती सतत आजारी असल्याने आजीने अल्पवयीन पीडित मुलीला विचारले. त्यावेळी तिने आजीला सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार समोर येताच आजीने तत्काळ ही घटना पीडितेच्या आईला सांगितली.

आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल :पीडितेच्या आईने दुबईतून भारतात परतल्यानंतर बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत पीडित मुलीवर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून २६ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपी बापाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला गेला. दाखल गुन्ह्याच्या आधारे पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरू केला असता, २६ ऑक्टोबर रोजी बदलापूर परिसरातील रेल्वे रुळावर आरोपी बापाचा मृतदेह आढळून आला होता.

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला. बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपी वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु गुन्हा दाखल होताच त्याच दिवशी आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केली. - अरुण क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

गुन्हा दाखल होताच रेल्वेखाली आत्महत्या :यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरुण क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करत बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपी वडिलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु, गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उप निरीक्षक जे. एम. धारके करीत असल्याचंही सांगितलं.

हेही वाचा:

  1. Mumbai Crime News : स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा निर्जनस्थळी विनयभंग, नराधमाला बेड्या
  2. Daughter in law molestation Case: सुनेशी लगट करत सासरा करायचा विनयभंग, तर पतीचेही परस्त्रीशी संबध, पीडितेची पोलिसात धाव
  3. Gangrape : धक्कादायक ! पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details