महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांना डोळ्यासमोर सारखे कमळच दिसते; सुभाष देशमुखांची खोचक टिप्पणी - कमळ

ज्या ठिकाणी पवार यांनी मतदान केले त्या ठिकाणी कमळ निशाणी नव्हती, तरी त्यांना बटन दाबताच कमळाची लाईट लागल्याचा साक्षात्कार कसा झाला, असा टोला देशमुख यांनी लगावला

सुभाष देशमुख

By

Published : May 11, 2019, 7:06 PM IST

ठाणे- ज्यांनी ५० वर्षे राजकारणात घालवली त्यांना आगामी काळातील राजकारणाचा अंदाज आला त्यामुळे पराभव होण्यापूर्वी ईव्हीएम मशीनचे कारण पुढे करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी चालवला असल्याचा निशाणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी साधला आहे. तसेच ज्या ठिकाणी पवार यांनी मतदान केले त्या ठिकाणी कमळ निशाणी नव्हती, तरी त्यांना बटन दाबताच कमळाची लाईट लागल्याचा साक्षात्कार कसा झाला, असा टोला देशमुख यांनी लगावला आहे.

शरद पवारांना डोळ्यासमोर सारखे कमळ दिसते - सुभाष देशमुख

सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने येत्या १७ ते १९ मे दरम्यान सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती देण्यासाठी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. पूर्वी मुघलांना पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे तसे आता पवारांचे झाले असून पराभवाची चाहूल लागली असल्याने उठसूठ त्यांना कमळ दिसत आहे. असल्याचे देशमुळ म्हणाले. तसेच दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने सर्व खबरदारी घेतली असून दुष्काळ निधीचे वाटप सर्वत्र करण्यात आले आहे. जनावरांना चारा आणि पाणी , मजुरांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देतानाच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच जशी मागणी येईल तशा चारा छावण्या उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पिकविम्याचे पैसे बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र, ज्यांच्या बँक खात्याचे नंबर चुकले आहेत त्यांना पीक विमा, शेतकरी सन्मान योजना आणि कर्जमाफीचा लाभ मिळवता आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण दिलेली बँक खात्यांचे नंबर पुन्हा एकदा तपासून पहावेत असे आवाहनही सुभाष देशमुख यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details