ठाणे - उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात १९९२ ते ९५दरम्यान रेतीवर बंदी असताना दगडाचा बारीक चुरा व वालवा रेतीपासून असंख्य इमारती उभारण्यात आल्या. त्याच इमारती काही वर्षांपूर्वी इमारती धोकादायक ठरवून महापालिकेने केवळ स्लॅब कटींग करीत कारवाई केली होती. त्यांनतर काही बांधकाम विकासकांनी त्या इमारतीचे पुन्हा स्लॅब भरून नागरिकांना सदनिका विक्री केल्या. आता त्याच नागरिकांच्या जीवावर उठल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. काल (शुक्रवारी) रात्री झालेल्या इमारत दुर्घटनेत ७ जणांचा बळी गेला असून अशा इमारती उभारणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतही दिले आहे.
३४ इमारतींचे स्लॅब कोसळून ४० पेक्षा जास्त जणांचा बळी ..
उल्हासनगर शहरात निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचे स्लॅब कोसळून दरवर्षी अनेकांचा बळी जातो. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या १० वर्षात ३४ इमारतींचे स्लॅब कोसळून ४०पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. काल रात्रीही उल्हासनगर २मधील नेहरू चौक, येथे साई शक्ती या पाच मजली इमारतीमध्ये दहा वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. पाचव्या मजल्यावरील एका सदनिकेचा पाचव्या मजल्यापासून पहिल्या मजल्या पर्यंतचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळला आहे. घटनेची माहिती कळताच ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काही प्रमाणात ढिगारा हटविला असून त्यातून सात जणांचे मृतदेह बाहेर काढले. या इमारतीमध्ये पाच मजले (तळ+5) आहेत.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह उपस्थित आहेत. सुरुवातीला ५ व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. तर ३ ते ४ व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. उल्हासनगर अग्निशामक केंद्राकडून बचावकार्य सुरू आहे. सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी असून जखमींना उपचारासाठी नेण्यात येत आहे.
हेही वाचा -जालना : रुग्णालयात तरुणाला मारहाण प्रकरणी पाच पोलीस निलंबित, पोलीस अधीक्षकांची कारवाई
१५ दिवसापूर्वी इमारतींचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू -