ठाणे -बदलापूरमध्ये शनिवारी दुपारी एका इमारतीत भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, घरातील संपूर्ण साहित्य आणि घर जळून खाक झाले आहे.
बदलापुरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग; आगीत घर जळून खाक - Badlapur fire building
बदलापूरमधील आंबेडकर चौक परिसरातील संतकवी कालिदास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली.
बदलापूरमधील आंबेडकर चौक परिसरातील संतकवी कालिदास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाला गेल्या.
दरम्यान, फ्लॅटमध्ये असलेल्यांना याची माहिती मिळताच त्यांना नागरिकांनी खाली आणले. या आगीवर बदलापूरच्या अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नांनी नियंत्रण मिळवले. या आगीत कुणालाही इजा झालेली नाही. मात्र, या आगीत घर संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.