महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खडवलीतील भातसा नदीत अज्ञात युवकाचा आढळला मृतदेह - भात्सा

कल्याण तालुक्यातील खडवली येथील भातासा नदीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला.

मृत व्यक्तीला बाहेर काढताना

By

Published : May 28, 2019, 3:44 PM IST

ठाणे - कल्याण तालुक्यातील खडवली येथील भातासा नदीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्थानिकांनी कल्याण तालुका पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी नोंद करत मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे.

मृत व्यक्तीला बाहेर काढताना


टिटवाळाजवळ असलेल्या खडवली गावातील भातसा नदीच्या प्रवाहात पूल परिसरात रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृत व्यक्ती अंदाजे ४० ते ४२ वर्षे वयाचा असून त्याची उंची साधरण ५ फुट तसेच छातीच्या उजव्या बाजूस गोंदलेले आहे. तर उजव्या हाताच्या मनगटावर जयभीम, असे गोंदलेले आहे. मृतदेह उल्हासनगरमधील मध्यवर्ती रूग्णालयात ठेवला असून मृतदेहाची ओळख पटण्यासाठी नागरिकांना पुढे यावे, असे आवाहन असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. बी. पाटील यांनी केले.


खडवली येथील भातसा नदी पिकनिक पॉईंट झाली असून सुट्ट्यांमध्ये तरुण, तरूणी, लहान मुले आणि ज्येष्ठांची गर्दी होते. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकांनी जीव गमाविला असून प्रशासनाने येथे जीवरक्षक नेमावे, अशी मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details