ठाणे -कुत्र्याचे पिल्लू ओरडल्याचा राग आल्यामुळे मालकाने दारूच्या नशेत त्या पिल्लाला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या घटनेत कुत्र्याचे पिल्लू गंभीर जखमी झाले. ही घटना अंबरनाथ मधील दुर्गा पाडा येथील सावली इमारतीमध्ये घडली.
कुत्र्याच्या पिल्लाला दुसऱ्या मजल्यावरून फेकणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बुद्धिराम लोट प्रसाद ( वय 40 ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बुद्धीराम हा अमरनाथ परिसरातील दुर्गा पाडा भागात साई सावली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बुद्धिराम लोट प्रसाद ( वय 40 ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बुद्धीराम हा अमरनाथ परिसरातील दुर्गा पाडा भागात साई सावली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो. सोमवारी सकाळच्या सुमारास काही भटके कुत्रे या पिल्लाला मारण्यासाठी इमारतीत घुसले होते. त्यावेळी हे कुत्र्याचे पिल्लू जोरात आरडाओरडा करत होतो. याचा बुद्धिराम याला राग आला. त्याने या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत कुत्र्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या कमरेचे हाड मोडले आहे. खळबळजनक बाब म्हणजे बुध्दीराम हे कृत्य करत असताना तो दारूच्या नशेत होता.
हा प्रकार शेजारी राहणाऱ्या प्राणीमित्र आणि कोचिंग क्लासच्या पिंकी डेव्हिड यांनी पाहिला. त्यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी बुद्धिरामवर प्राणी अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.