महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात आईवरून शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा खून - पोलीस

आईवरून शिवी दिल्याच्या कारणाने, मित्रानेच मित्राचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. ही धक्कादायक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अजय शर्मा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मिथुन चोरगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ठाण्यात आईवरून शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा खून

By

Published : Apr 17, 2019, 9:53 PM IST

ठाणे- आईवरून शिवी दिल्याच्या कारणाने, मित्रानेच मित्राचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. ही धक्कादायक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अजय शर्मा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मिथुन चोरगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खून प्रकरणाची माहिती देताना पोलीस


विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीच्या चिंचपाड भागातील मैदानात १४ एप्रिलला मिथुन आणि अजय हे दोघे बोलत होते. याच दरम्यान, मिथुनने अजयला आईवरुन शिवी दिली. याचा राग आल्याने, अजयने त्याच्याकडे असलेल्या चाकू मिथुनच्या पोटात भोसकला.

जखमी अवस्थेत असलेल्या मिथुनने घराकडे धाव घेतली. मात्र, रक्तस्राव खूप झाल्याने तो घराबाहेर बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यांची पत्नी व नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपी अजयला अटक केली आहे. अजयला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने त्याला ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details