महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीला परत आणण्यासाठी चिमुरडीचे अपहरण; अपहरणकर्त्यास बेड्या

पोलिसांनी तत्काळ तपास करून अपहरणकर्त्याच्या तावडीतून अवघ्या सहा तासातच चिमुरडीची सुटका करण्यात यश मिळवले. अब्दुल कलाम अजीज चौधरी असे अपहरणकर्त्याचे नाव असून त्याला मोबाईल लोकेशनच्या आधारे बदलापुरातील वालीवली गावातून अटक केली आहे.

पत्नीला परत आणण्यासाठी चिमुरडीचे अपहरण; अपहरणकर्त्यास बेड्या

By

Published : May 9, 2019, 9:00 PM IST

ठाणे - घर सोडून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी पतीने तीन वर्षीय चिमुरडीचे अपहरण केले. ही घटना भिवंडीतील देऊनगर परिसरातील मोहमद अली कंपाऊंडमधील चाळीत घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तत्काळ तपास करून अपहरकर्त्याच्या तावडीतून अवघ्या सहा तासातच चिमुरडीची सुटका करण्यात यश मिळवले. अब्दुल कलाम अजीज चौधरी असे अपहरणकर्त्याचे नाव असून त्याला मोबाईल लोकेशनच्या आधारे बदलापुरातील वालीवली गावातून अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अब्दुल हा व्यसनाधीन झाल्याने त्याची पत्नी त्याला सोडून त्याचा नात्याने चुलत भाऊ असलेल्या मोहम्मद इर्शाद अंसारी याच्यासोबत भिवंडीत राहू लागली होती. त्यामुळे आपली पत्नी परत मिळावी या हेतूने मोहम्मद अंसारी याच्या तीन वर्षीय चिमुरडीचे आरोपी अब्दुलने अपहरण करून मुलीच्या बदल्यात आपल्या पत्नीची मागणी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

मोहमद अली कंपाऊंडमधील चाळीतील घरात मोहम्मद इर्शाद इद्रिस अंसारी यांची तीन वर्षांची मुलगी आलिया खेळत होती. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी अब्दुल याने मुलीला अंडे खाण्यास घेऊन जातो, असे सांगत घराबाहेर घेऊन गेला. मात्र खूप उशीर झाला तरी तो परत आलाच नाही. त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या चिमुरडीचे वडील मोहम्मद इर्शाद अंसारी याने भोईवाडा पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजता मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. संशयित म्हणून अब्दुल कलाम अजीज चौधरी याचे नाव नोंदवण्यात आले. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी पोलिसांची पाच वेगवेगळी पथके करून कल्याण रेल्वे स्टेशन, डोंबिवली व त्याच्या नेहमीच्या ठिकाणी रवाना केली.

पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा तांत्रिक तपास केला. वालवली, बदलापूर (पश्चिम ) या ठिकाणी लोकेशन दाखविल्यावर पोलिसांची सर्व पथके त्या ठिकाणी पोहोचली. तेथील एका खोलीतून अपहरणकर्त्यास ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून चिमुरडी आलियाची सुखरूप सुटका करण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details