ठाणे - १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीला शेजारी राहणाऱ्या २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहूल या नराधमाला अटक केले आहे.
ठाण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; नराधम गजाआड - school
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नराधम राहुल विरोधात बलात्कारासह पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. नराधमाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित अल्पवयीन विद्यार्थीनीच्या नराधम राहुल शेजारी राहत असल्याने त्यांची आधीपासून ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेवून त्याने पीडित विद्यार्थीनीला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे हा नराधम गेली ८ महिने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत होता. अखेर त्या पीडित मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले. घरांच्यानी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली.