ठाणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अनोखे आंदोलन करीत उल्हासनगरच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे शहरातील अनेक रेशनिंग दुकानावर सध्या निकृष्ट दर्जाचे मीठ दिले जात असल्याच्या निषेधार्थ शिधावाटप अधिकार्याच्या टेबलावर मीठ ओतून आंदोलन केले.
शिधावाटप अधिकार्याच्या टेबलावर मनसैनिकांनी ओतले मीठ - mumbai
महाराष्ट्र राज्यात मिठागर असतानाही चढ्या भावाने गुजरात मधून आणलेलं मीठ महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानदारांना वितरण करण्याची सक्ती राज्य सरकारकडून केली जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्यात मिठागर असतानाही चढ्या भावाने गुजरातमधून आणलेलं मीठ महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानदारांना वितरण करण्याची सक्ती राज्य सरकारकडून केली जात असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या मिठामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ही या मनसैनिकांनी उपस्थित केला. तसेच नागरिकांनी वारंवार या मिठा बाबत तक्रारी करून देखील या मिठाचे वितरण शिधावाटप दुकानावर बंद न झाल्याने, आज दुपारच्या सुमारास शिधावाटप अधिकाऱ्याच्या टेबलावर मीठ ओतून जोरदार घोषणाबाजी करत, युती सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले आहे.