ठाणे -देशात पुन्हा एकदा दहशतवादाचा चेहरा समोर आला आहे, विशेष दहशतवादी पथकाने ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांना अटक केली आणि एकच खळबळ उडाली आहे. याचदरम्यान मुंबईमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या दहशतवाद्याच्या चौकशी मिळालेल्या माहितीवर मुंब्रा भागातून एकाला ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याचे दहशतवादी विरोधी पथक करीत आहे.
महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा येथून संशयिताला घेतले ताब्यात ठाण्यात एटीएसची कारवाई -
मुंबई दहशतवादी विरोधी पथकाच्या कारवाईनंतर अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात मुंब्रा येथील एक तरुण होता. तो संशयास्पद दहशतवाद्याचा मित्र असल्यामुळे त्याला दहशदवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. याला स्थानिक नागरिकांनीद्वारे पुष्टी देण्यात आली आहे. ताब्यात असलेला संशयित रिजवान मोमीन असे त्याचे नाव असून तो मुंब्रा कौसा चांद नगर येथील नुरी सोसायटी यामध्ये भाड्याने राहत होता. त्याने खाजगी शिकवणी सुरू केले होते.
घर, क्लासेस रूम टाळे -
दहशतवाद्यांच्या चौकशीत जेव्हा रिजवान याच्या नावाचा उल्लेख झाला. त्यावेळेस पोलिसांचे पथक परिसरात दाखल झाले आणि या संशयिताच्या निवासस्थानी पोहोचले असता त्याच्या घराला टाळ लावल्याचे समोर आले. रिजवान मुंब्रा कौसा येथे खाजगी शिकवणी चालवत होता. त्याच्या क्लासेसला देखील टाळे लागलेले होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर स्थानिक पोलिसांची विचारणा केली, असता त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही.
रिजवान मोमीनच्या संधंबातील एकास ताब्यात -
रिजवान मोमीन हा मुंब्रा कौसा पूर्वी मुंबईतही शिक्षकी पेशा निभावत होता. अलीकडच्या काळात मोमीन हा मुंब्रा येथे भाड्याने रूम घेऊन राहत होता. दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा कौसा परिसरातील एका संशयिताला मोमीनचा सुरू असलेला शोध आणि चौकशी करता ताब्यात घेतले. यामुळे सहा दहशतवाद्यांशी संबंधित असलेला रिजवान मोमीन हा मुंब्रा भागातून सापडणे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र दहशतवादी पथक लपलेल्या दहशतवाद्यांना शोधत मुंब्रा कौसा परिसरात धडकले. यामुळे आता स्थानिक पोलीसही सतर्क झाले आहेत.
हेही वाचा - दहशतवादी कारवाई प्रकरण : मुंब्रातून आणखी एकास अटक