महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2019, 11:58 AM IST

Updated : Jul 30, 2019, 7:06 PM IST

ETV Bharat / state

तरुणाचे प्रसंगावधान.. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची आर्त हाक प्रशासनापर्यंत पोहोचवली

मुंबईजवळच्या वांगणीमधील पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस आणि त्यातील प्रवाशांची सुटका करण्यात कोल्हापूरच्या विश्वजीत भोसले नावाच्या तरुणाने महत्वाची भूमिका पार पाडली होती. विश्वजीतने शेअर केलेले व्हिडीओ पाहून सकाळपासून सर्वच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याची बातमी लावून धरली.

महालक्ष्मी

ठाणे - मुंबईजवळच्या वांगणीमधील पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस आणि त्यातील प्रवाशांची सुटका करण्यात कोल्हापूरच्या विश्वजीत भोसले नावाच्या तरुणाने महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याने या ट्रेनची परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमाने सर्वत्र पोहचवत प्रशासनाला जाग आणली होती.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची आर्त हाक तरूणाने प्रशासनापर्यंत पोहोचवली

मुंबईजवळील वांगणी येथे२६ जुलैला पुराच्या तडाख्यात मुंबई ते कोल्हापूरला जाणारी 'महालक्ष्मी एक्सस्प्रेस' अडकून पडली होती. या ट्रेनने १०५० च्या जवळपास प्रवासी प्रवास करत होते. अंबरनाथजवळ मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साठलेले असल्याने त्याठिकाणी काही काळ रेल्वे थांबवण्यात आली. रुळावरून पाणी उतरताच गाडी आपल्या दिशेने निघाली. बदलापूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर कासगावजवळ गाडी पुन्हा थांबली. काही वेळ गाडी थांबून पुन्हा पुढे निघेल अशी प्रवाशांना अपेक्षा होती. पण, पाण्याच्या वाढत्या जोरात गाडी अडकून पडली. ही ट्रेन जवळजवळ 15 तास पुरात अडकून होती. याच ट्रेनमधून प्रवास करणारऱ्या एका तरुणाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत सोशल मीडियाचा उत्तम वापर करत ही घटना वृत्तवाहिन्या आणि शासनापर्यंत पोहोचवली.


विश्वजीतने शेअर केलेले व्हिडीओ पाहून सकाळपासून सर्वच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याची बातमी लावून धरली. जवळजवळ 15 तासांनंतर स्थानिक गावकर्‍यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना धीर दिला. प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलानं मिशन महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू करत सर्वच प्रवाशांची सुखरूप सुटका केली.


विश्वजीत भोसले यांनी जागृक नागरिक म्हणून प्रसंगावधान राखत केलेल्या या कामगिरीमुळे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या कुटुंबीयांना त्यांच्या नातेवाईकांची माहिती मिळण्यास मदत झाली. थरकाप उडवणाऱ्या अशा परिस्थितीतही विश्वजीत यांनी धीर न सोडता मिशन महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये केलेल्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Last Updated : Jul 30, 2019, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details