महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID१९ : आता एका सीटवर एकच प्रवासी... एसटी महामंडळाचा निर्णय - कोरोना

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. या आवाहनाचा मान राखत अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या एसटीबसमध्येही गर्दी कमी कशी होईल, याकडे लक्ष देण्यात येत आहे. ठाणे बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसमध्ये एका आसनावर केवळ एक प्रवासी बसवत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एसटीबस
एसटीबस

By

Published : Mar 19, 2020, 5:20 PM IST

ठाणे- कोरोनाच्या विरोधात शासन आणि प्रशासन सगळ्यांनीच दंड थोपटले आहेत. ठाण्याच्या बसस्थानकात दिवसरात्र येथे प्रवाशांची वर्दळ सुरू असते. परंतु, कोरोना विरोधातील लढ्यात आता एस.टी. महामंडळ देखील राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करताना दिसत आहे. त्यामुळेच एसटी प्रशासनाने बसची प्रवासी वाहतूक निम्म्यावर आणली आहे.

बोलताना वाहक व प्रवासी

आज ठाण्यातील बसस्थानकात शुकशुकाट होता. स्थानक परिसरात तुरळक प्रवासीच येथे बघायला मिळाले. जे प्रवासी यात्रा करत होते, त्यांना प्रत्येकी एका सीटवर बसवून नेण्यात येत होते. तोंडावर मास्क लावलेले बसचे चालक आणि वाहक प्रवाशांना योग्य त्या सूचना देताना दिसत होते. घरी बसून काम करणे आपणही पसंत केले असते. पण, तशी सोय आपल्या व्यवसायात नसल्याने नाईलाजास्तव प्रवास करावा लागत असल्याची खंत काहींनी व्यक्त केली. 44 प्रवाशांची क्षमता असताना केवळ 21 प्रवाशांचीच वाहतूक करत असून सरकारी आदेशाचे तंतोतंत पालन करत असल्याची माहिती बस वाहकांनी दिली.

हेही वाचा -फिलिपाईन्समध्ये अडकले ३० भारतीय विद्यार्थी; नातेवाईकांनी शासनाला मागितली मदत

ABOUT THE AUTHOR

...view details