महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक! अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार; आरोपीच्या मित्रानेही पीडीतेला ब्लॅकमेल करून उकळले पैसे - GF

विवेक रंजीत यादव (वय 21) असे नराधम प्रियकराचे नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशमध्ये राहणार आहे. सध्या तो भिवंडीतील काटई गावात भाड्याच्या खोलीत राहत आहे, तर सुरज रामपेज विश्वकर्मा (वय 19) असे पीडितेला अत्याचाराचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या ब्लॅकमेलर मित्राचे नाव आहे.

ठाणे

By

Published : Jul 23, 2019, 9:38 PM IST

ठाणे- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर नराधम प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे मित्राशी शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने या संबंधाचा नराधम प्रियकराच्या मित्राने गैरफायदा घेऊन पीडित मुलीला अत्याचाराचे बिंग फोडण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीकडून पाच 5 हजार रुपये घेऊन आणखी 17 हजार रुपयाच्या मागणीसाठी तगादा लावला होता. याप्रकरणी ब्लॅकमेलर मित्रासह नराधम प्रियकराला निजामपुरा पोलिसांनी अटक केले आहे.

अल्पवयीन प्रेयसीवर प्रियकराचा बलात्कार; बिंग फोडण्याची भीती दाखवून पीडीतेकडून ब्लॅकमेलर मित्राने मागितले पैसे

विवेक रंजीत यादव (वय 21) असे नराधम प्रियकराचे नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशमध्ये राहणार असून सध्या तो भिवंडीतील काटई गावात भाड्याच्या खोलीत राहत आहे. तर, सुरज रामपेज विश्वकर्मा (वय 19) असे पीडितेला अत्याचाराचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या ब्लॅकमेलर मित्राचे नाव आहे.

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. काही महिन्यापूर्वी नराधम विवेक याने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या अत्याचाराची बाब नराधम विवेकचा मित्र सुरज याला समजली. त्यानंतर त्याने पीडित मुलीला धमकी देत तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचे बिंग फोडून तसेच तुझ्या घरच्यांना सांगून तुला बदनाम करेल, जर पैसे दिले नाही तर तुझ्या लहान भावाला मारून टाकेल, अशी धमकी देखील विवेकचा मित्र सुरज याने पीडित मुलीला दिली.

या धमकीमुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर बलात्कार करणाऱ्या विवेकविरोधात तर धमकी देऊन पैसे मागितल्याप्रकरणी सुरजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच निजामपुरा पोलिसांनी काही तासातच या दोघाही नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज दोघाही आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय आर. जे . धोंडगा करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details