नवी मुंबई - नवी मुंबई येथे १३ जुलैच्या मध्यरात्री पासून पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. टाळेबंदी असूनही शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १९ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
नवी मुंबईत १९ जुलैपर्यंत टाळेबंदी वाढवली; कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पालिकेचा निर्णय - नवी मुंबई कोरोना अपडेट
नवी मुंबईत गेल्या ४८ तासांमध्ये ६१४ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ९ हजार कोरोनाबाधित रुग्णांचा टप्पा नवी मुंबईने ओलांडला आहे.
नवी मुंबईत गेल्या ४८ तासांमध्ये ६१४ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ९ हजार कोरोनाबाधित रुग्णांचा टप्पा नवी मुंबईने ओलांडला आहे. वाढती रुग्णवाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून, नवी मुंबईमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही नवी मुंबईत शनिवारी २५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे.
कडक निर्बंधांसहित टाळेबंदी लागू असतानाही सततच्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आतापर्यंत कोरोनामुळे नवी मुंबईतील २९२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे १३ जुलैच्या मध्यरात्री पासून ते १९ जुलै पर्यंत नवी मुंबईत टाळेबंदी वाढविण्यात आली आहे.