महाराष्ट्र

maharashtra

ठाण्यात बार आणि रेस्टॉरंटमध्ये १० दिवस मद्यविक्री बंद - बार असोसिएशन

By

Published : Apr 2, 2021, 10:01 PM IST

Updated : Apr 2, 2021, 10:53 PM IST

परवाना नूतनीकरण केल्याशिवाय बार अँड रेस्टोरंट बेकायदेशीरपणे चालविणे योग्य नसल्याने ठाण्यातील तब्बल ४१८ हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट यांनी आज (शुक्रवार) पासून ठाण्यात मद्यविक्री बंद करण्याची घोषणा केलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची फी ही ६ लाख ३६ हजार एवढी असून ती शासनाला महसूलरूपी आगाऊ देण्यात येते. परवाना नूतनीकरण केल्यानंतर रेस्टॉरंट चालविण्यात येते.

बार
बार

ठाणे -कोरोनामुळे ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल्स, बार अँड रेस्टॉरंट यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अँड रेस्टॉरंट चालविणे शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अँड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारपासून मद्यविक्री बंद करण्यात आलेली आहे. सरकारला महसूल हवा असल्यास त्यांनी सवलत द्यावी, असा सूर ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीने लावण्यात आला आहे.

माहिती देतांना प्रतिनिधी
सन २०२० हे वर्ष जवळपास कोरोनाच्या संकटातच गेले. अनेक महिने हॉटेल्स, बार अँड रेस्टोरंट बंद राहिल्याने मद्याची विक्री करणाऱ्या रेस्टॉरंट मालकांकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नाहीत. परवाना नूतनीकरण केल्याशिवाय बार अँड रेस्टॉरंट बेकायदेशीरपणे चालविणे योग्य नसल्याने ठाण्यातील तब्बल ४१८ हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट चालकांनी आज (शुक्रवार) पासून ठाण्यात मद्यविक्री बंद करण्याची घोषणा केलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची फी ही ६ लाख ३६ हजार एवढी असून ती शासनाला महसूलरूपी आगाऊ देण्यात येते. परवाना नूतनीकरण केल्यानंतर रेस्टॉरंट चालविण्यात येते. दरम्यान २०२० वर्ष कोरोनाच्या संकटात गेल्याने आणि अनेक महिने रेस्टॉरंट बंद राहिल्याने नव्या वर्षाच्या परवाना नूतनीकरणासाठी रेस्टॉरंट मालकांकडे पैसेच राहिले नाहीत. त्यात नव्या आर्थिक वर्षात पुन्हा कोरोनाची घरघर लागल्याने रेस्टॉरंट हे रात्री ८ वाजताच बंद करण्यात येत आहे. ग्राहक येण्याच्या वेळेसच रेस्टॉरंट बंद करावी लागत असल्याने व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यात कर्मचाऱ्यांचा पगार, लाईटबील, यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लाखोंचे शुल्क भरणे मुश्किल झाल्याचे हॉटेल असोसिएशने सांगितले आहे.


'तीन टप्प्यांत फी घ्या'
सरकारने बार अँड रेस्टॉरंट परवाना नूतनीकरण करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क टप्प्या-टप्प्याने भरण्याची सवलत द्यावी अशी मागणी ठाणे हॉटेल असोसिएशनद्वारे करण्यात आली आहे. मात्र सरकार मागणीला प्रतिसाद देत नसल्याने अखेर ठाण्यातील बार अँड रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद केली आहे. तब्बल ४०० पेक्षा जास्त बार अँड रेस्टॉरंटनी परवाना नूतनीकरण शुल्क भरले नसल्याने सरकारचेही कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.

हेही वाचा-'पीएमपीएमएल' बंद करू नका; संचारबंदीमधील काही निर्बंधांना भाजपचा विरोध

Last Updated : Apr 2, 2021, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details