महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेल्या 24 तासात कल्याण डोंबिवलीत नवीन १६० कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या 2 हजाराच्या वर - कल्याण डोंबिवली कोरोना न्यूज

गेल्या २४ तासात कल्याण डोंबिवलीत नव्याने १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत महापालिका हद्दीत २ हजार ६३ रुग्णांची नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

kalyan dombivalic
गेल्या 24 तासात कल्याण डोंबिवलीत नवीन १६० कोरोनाग्रस्तांची नोंद

By

Published : Jun 13, 2020, 10:05 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. गेल्या २४ तासात नव्याने १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत महापालिका हद्दीत २ हजार ६३ रुग्णांची नोंद असल्याचे सांगण्यात आले असून, यापैकी ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारप्रमाणे शनिवारीही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळाले आहे. तर कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यात वाढल्याचे दिसून आले. कल्याण डोबिंवली क्षेत्रातील सध्या तब्बल १ हजार ४३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर कोरोनातून मुक्त होऊन घरी जाण्याऱ्या रुग्णांची संख्या ९६३ वर पोहोचली आहे. तर आजपर्यंत मृतांचा एकूण आकडा ५७ वर गेला आहे.

महापालिका प्रशासनाने रुग्णांची विगतवारी आजपासून पत्रकरांना देणे बंद केल्याने महापालिका हद्दीत आज आढळून आलेले १६० रुग्ण कोणत्या परिसरातील आहेत. हे समजू शकले नाही. मात्र, आजपर्यंत महापालिका हद्दीत २ हजार ६३ रुग्णांची नोंद असल्याचे सांगण्यात आले असून यापैकी ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


दरम्यान, कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खालील नमुद क्षेत्र हे कंटेनमेंट क्षेत्र (प्रतिबंधीत क्षेत्र) म्हणून घोषित केले आहेत. 'क' प्रभाग क्षेत्रातील मौलवी कंपाऊंड, रोहिदास वाडा, अन्सारी चौक, मोहल्यातील मच्छीबाजार, डॉ. आंबेडकर रोड, रेतीबंदर परिसर, टेकडी कब्रस्तान, दुधनाका या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याने या परिसरातील मेडीकल स्टोअर्स, रूग्णालये/क्लिनिक, एलपीजी गॅस सिंलेडर पुरवठा या आस्थापनांना २४ तास सुरु राहणार आहेत.


सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत बेकरी, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), किराणा दुकाने, भाजीपाला इ. दुकाने वगळता अन्य सर्व व्यावसायीक आस्थापना/ दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सदर हद्दीत कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक व नागरिकांच्या येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असून, यामधून अत्यावश्यक सेवेतील वाहने व व्यक्तींना सूट देण्यात येत आहे. तसेच दूध नाका परिसरातील दूध विक्रीही सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ३ ते ५. याकालावधीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तथापी, सदर ठिकाणी बाहेरील व्यक्तींना दुध खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या परिसरातील सीमांचे नियमन अत्यंत काटेकोरपणे करण्यासाठी 'क' प्रभागक्षेत्र अधिकारी व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करणेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details