महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime: मास्तराचा वचपा काढण्यासाठी शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना शारीरिक सुखाची ऑफर; पण घातली 'अशी' अट

By

Published : Mar 23, 2023, 10:49 PM IST

एका बालसुधार गृहातील शिक्षिकेने पुरुष शिक्षकाचा वचपा काढण्यासाठी तेथील अल्पवयीन विद्यार्थ्यांनाच शारीरिक सुखाची ऑफर दिली. यानंतर आरोपी शिक्षिकेने काही विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणही केल्याचा प्रकार समोर आला आहे. 'आधी तू मुलांना भडकवं आणि मास्तरांवर हात उचला, तरच मी तुला शारीरिक सुख देईल', अशी विचित्र अटही तिने घातली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस प्रशासनाकडून आरोपीविरुध्द पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Crime
विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण

विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

ठाणे:भिवंडी शहरातील कचेरीपाडा भागात राज्य शासनाच्या वतीने बालसुधार गृह असून हे बालसुधार गृह भिवंडीतील एका संस्थेमार्फत चालविण्यात येते. संस्थेकडून विद्यार्थ्यांकरिता शिक्षकांची नेमणूक केली गेली होती. मात्र, या बालसुधार गृहात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका शिक्षिकेकडून काही मुलांचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याच्या वारंवार तक्रारी पीडित मुलांकडून बाल न्यायालयात केल्या जात होत्या.


अश्लील चित्रफीत दाखवून विनयभंग:त्यातच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेने संस्था संचालक आणि बालसुधार गृहाच्या उप अधीक्षकावर आठ महिन्यांपूर्वी व्हिडीओमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून विनयभंग केला. शिवाय जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केल्याने संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर या शिक्षिकेला निलंबित केले. शिवाय बाल न्यायालयीन आदेशानुसार संबंधित प्रकरणाची जिल्हा महिला बाल विकास समितीच्या अध्यक्षा आणि सदस्यांकडून चौकशी सुरू असतानाच, बालसुधार गृहातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला शारीरिक सुखाची ऑफर या शिक्षिकेने दिल्याचे चौकशीतून समोर आले.


शिक्षिकेकडूनही गुन्हा दाखल: पीडित मुलांसह आणखी दोन मुलांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीच्या आधारे संरक्षण अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक प्रकाश दाजी गुडे (वय, ३९) यांच्या तक्रारीवरून त्या शिक्षिकेवर २१ मार्च २०२३ रोजी आरोपीविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केली. यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली. या शिक्षिकेनेही संस्था संचालक आणि बालसुधार गृहाच्या उपअधीक्षकावर मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: दुसरीकडे पीडित मुलांवर होणाऱ्या लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एका बालसुधार गृहातील शिक्षिकेचा समावेश असल्याचा संशय जिल्हा महिला बालविकास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त खैरनार यांच्याशी संर्पक साधला असता, बालसुधार गृहातील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा:Nashik Crime: खळबळजनक! चिमुकली आपल्याकडे बघत नसल्याने आईकडून पोटच्या मुलीची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details