ठाणे - एका मुलीने दुसरीवर चाकू हल्ला करुन जखमी केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. या दोघींचा प्रियकर एकच मुलगा असल्याने या दोघीत वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यातच एकीने दुसरीवर चाकू हल्ला केला. हल्ला करणाऱ्या मुलीचे नाव बिंदू असून, जखमी मुलीचे नाव काजल आहे. या दोघीही एका केक शॉपमध्ये काम करतात.
प्रियकरावरुन दोन तरुणींमध्ये घमासान, एकीचा दुसरीवर चाकुने वार - crime
या दोन्ही मुली एका केक शॉपमध्ये काम करतात. दोघींचा प्रियकर एकच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघीत वाद झाला.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ५ येथील नेताजी चौक परिसरात केक शॉप नावाचे दुकान आहे. त्या दुकानात काजल आणि बिंदू या दोन मुली कामाला आहेत. त्या दोघी शिक्षण घेत काम करतात. या दोघींचा प्रियकर एकच मुलगा आहे, असे दोघींच्या लक्षात आले. त्यावरुन दोघीत वाद झाला. बिंदूने काजलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचे पर्यवसन हाणामारीत झाले.
या हाणामारीत बिंदुने केक कापण्याच्या सुरीने काजलवर वार केला. यात तिच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर काजलला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिंदुवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.