ठाणे - स्वस्त धान्य दुकानासाठी असलेल्या तांदळाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसुख निजाम या ट्रक चालकाला अटक केली असून ट्रकमधील २०० पोती तांदूळ ताब्यात घेतला आहे. मनसुखच्या पाच फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
शासकीय गोडाऊनमधून स्वस्त धान्य दुकानासाठी धान्य घेऊन निघालेला ट्रक हे धान्य बाजारात विकण्यासाठी येत आहे, अशी माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली. कल्याणकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. ट्रक चालकाने दाखवलेल्या कागदपत्रांबाबत संशय आल्याने त्यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना पाचारण केले.