महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांनी कुष्ठ रोगींच्या वसाहतीची केली पाहणी - कचोरे गाव कुष्ठ रोग

महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने कुष्ठ रोग निवारण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी कल्याणमधील कुष्ठ रोगींच्या वसाहतीची पाहणी केली. यावेळी पालिका हद्दीतील कुष्ठरोग्यांच्या संख्येमध्ये झालेली वाढ चिंताजनक असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

Commissioner Suryavanshi visit Leprosy colony
कुष्ठ रोग वसाहत पाहणी

By

Published : Jan 30, 2021, 4:56 PM IST

ठाणे -महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने कुष्ठ रोग निवारण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी कल्याणमधील कुष्ठ रोगींच्या वसाहतीची पाहणी केली. यावेळी पालिका हद्दीतील कुष्ठरोग्यांच्या संख्येमध्ये झालेली वाढ चिंताजनक असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

माहिती देताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

हेही वाचा -शहापूरच्या बेलवड परिसरात बिबट्याची दहशत; शेतकऱ्याची गाय केली फस्त

सूर्यवंशी यांनी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने कल्याण पूर्वेतील कचोरे गावातील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीची पाहणी करून या वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राची (रुग्णालय) पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना, कुष्ठरोग्यांच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लवकरच कुष्ठ रोग वसाहती मधील रुग्णालय सुरू होईल..

वसाहतीत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, मार्च-एप्रिल पर्यंत ते खुले होईल, अशी माहिती आयुक्त सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली. तसेच, यावेळी वसाहतीतील नागरी समस्यांची पाहणी करून येथील नागरिकांकडून इतरही समस्या जाणून घेतल्या असून, लवकरच यावर उपाययोजना करत येथील नागरिकांना रोजगार निर्मिती करण्याचा मानस यावेळी आयुक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

४० वर्ष उलटूनही वसाहतीचा नागरी विकास झालाच नाही..

कल्याण पूर्वेत ४० ते ४५ वर्षांपासून कचोरे गावातील हनुमान नगर भागात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण झाली. या वसाहतीत सुमारे २०० हून अधिक घरे कुष्ठ रोग्यांची आहेत. तर, यामध्ये ११० कुष्ठरोगींची संख्या असून, ४० वर्षे उलटूनही या वसाहतीचा नागरी विकास झाला नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मनसे कार्यकर्त्याकडून मदत

ABOUT THE AUTHOR

...view details