महाराष्ट्र

maharashtra

Kalwa Hospital Update : कळवा रुग्णालयामधील अतिदक्षता कक्ष फुल, 5 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात हलविले!

By

Published : Aug 16, 2023, 12:06 PM IST

ठाणे महापालिकेतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयानंतर कळवा आणि सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग पूर्णपणे भरले आहेत.

रुग्णालयातीतल सर्व ICU फुल
रुग्णालयातीतल सर्व ICU फुल

ठाणे :महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील 5 रुग्ण हे सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. हे रुग्ण हलवण्यात आल्यानंतर आता कळवा आणि सामान्य अशा दोन्ही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील बेड पूर्णपणे भरले आहेत. दोन्ही रुग्णालयातील ठिकाणी अतिदक्षता विभागातील बेड तात्काळ वाढवले गेले नाही, तर पुन्हा गंभीर परस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

आयसीयू झाले पूर्ण भरले : ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात मृत्यूचे प्रकरण झाल्यानंतर रुग्णालयातील बेड वाढवण्यासंदर्भात उपाय योजनांवर भर देण्यात येत आहे. मात्र याची अंमलबजावणी तातडीने होणे तूर्तास शक्य नाही. दुसरीकडे कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील बेड्स आधीच भरले आहेत. त्यामुळे कळवा रुग्णालयातील 5 रुग्ण हे सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहेत. कळवा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची क्षमता ही 40 बेडची आहे. सध्या या ठिकाणी 39 रुग्ण दाखल आहेत. तर सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची क्षमता ही 24 बेड्सची आहे. कळव्यातील पाच रुग्ण या ठिकाणी हलविण्यात आल्यानंतर आता सामान्य रुग्णालयाचीही क्षमता संपली आहे. आता नवा गंभीर स्वरूपाचा रुग्ण आल्यास त्याला दाखल कुठे करायचा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन बालकांचा मृत्यू: कळवा रुग्णालयात मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी अजून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एका मुलाला रुग्णालयात जेव्हा आणण्यात आले त्यावेळीच या बाळाचा मृत्यू झाला होता. तर एका बाळाच्या हृदयाला वॉलची समस्या असल्याने 20 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. या दोन्ही मृतांची नावे सांगण्यास मात्र रुग्णालयाने नकार दिला आहे. तर परिस्थिती गंभीर होईल.

शस्त्रक्रियेला दोन दिवस सुट्टी : कळवा रुग्णालयात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. मात्र दोन दिवस शस्त्रक्रियाच बंद असल्याने आयसीयुमध्ये शस्त्रक्रिया झालेला रुग्ण येणार नाही. परंतु सुट्टीचे दिवस संपल्यानंतर परिस्थिती मात्र गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

सिव्हिलचे जनरल बेड भरले: सामान्य रुग्णालय नेमके कुठे स्थलांतरित करण्यात आले आहे. याबाबत व्यवस्थित जनजागृती करण्यात आली नसल्याने रुग्णांचा सर्व भार हा कळवा रुग्णालयावर पडत होता. त्यामुळे एकीकडे कळवा रुग्णालयाचे जनरल बेड फुल झाले. परंतु सिव्हिल रुग्णालयातील 150 पेक्षा अधिक बेड रिकामे होते. मात्र आता सिव्हिल रुग्णालयाशीही समन्वय झाल्यानंतर आता सिव्हिल रुग्णालयाचेही जनरल बेड भरले आहेत. या ठिकाणी केवळ 30 बेडच शिल्लक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

  • कळवा रुग्णालयातील आयसीयूची क्षमता -40 बेड सध्या दाखल असलेले रुग्ण -39
  • सिव्हिल रुग्णालयामधील आयसीयूची क्षमता- 24 सध्या दाखल असलेले रुग्ण- 24
  • कळवा रुग्णालयातील जनरल वॉर्डची क्षमता - 500 बेड सध्या दाखल असलेले रुग्ण -504
  • सिव्हिल रुग्णालयामधील जनरल वॉर्डची क्षमता- 336 सध्या दाखल असलेले रुग्ण -306

हेही वाचा-

  1. CM Visited Kalwa Hospital: मुख्यमंत्र्यांनी कळवा रुग्णालयात घेतला आढावा, आरोग्य सुविधांसाठी 71 कोटींचा निधी देण्याची केली घोषणा
  2. Kalwa Hospital Patients Death : कळवा रुग्णालयात आणखी चौघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली रुग्णालयाला भेट

ABOUT THE AUTHOR

...view details