ठाणे -राज ठाकरे यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला आहे का?. अथवा डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला आहे का?. तुमच्या कडून हे कधी घडतच नाही. तुम्ही फक्त बोट दाखवण्याचे काम करता. पण, बोट दाखवताना तीन बोट स्वतः कडे असतात. त्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेली शिकवण आहे. जशास तसे उत्तर द्या, त्या शिवाय माणूस जमिनीवर येत नाही, जागेवर येत नाही, असे प्रत्युत्तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिले ( Jitendra Awhad Reply Raj Thackeray ) आहे.
महाराष्ट्रात नवीन जॉनी लिव्हर - जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक नवीन जॉनीलिव्हर जन्माला आला असून, तो सर्वांची मिमिक्री करून दाखवत आहे. त्यासोबत सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेला हत्तीचे सुळे तसे खूप असतात, अशी टीकाही त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे.