ठाणे -मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची ओळख परेड करीत आरोपींच्या नावात गुप्तता बाळगण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मंत्री आव्हाड यांना सोशल मीडियावर धमकावणाऱ्या आणि अश्लील पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कारवाई करावी, असे निवेदन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. अटक पाचही आरोपींना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेनंतर आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि धमकाविण्याचे मेसेज टाकण्यात आलेले आहेत. एकीकडे वैचारीक युद्ध चालू असताना निष्कारण अश्लील भाषेचा वापर करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतो. दुसरीकडे खून, बलात्कारासारख्या धमक्या दिल्या जातात. याच्याविरुद्ध कार्यकर्त्यांकडून उद्रेक झाला तर निष्कारण त्या कार्यकर्त्यांना दोष दिला जातो. तरी आपण याला वेळीच अटक करावी आणि तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.