ठाणे - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाण्यामध्ये आलेत. ठाण्यात हेलिकॉप्टरने आल्यानंतर आव्हाड यांनी पवारांचे स्वागत करत वाहन चालवण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यानंतर त्यांच्या नाद बंगल्यावर नेऊन त्यांच्या सोबत चहापान केले.
शरद पवारांचे सारथी झाले जितेंद्र आव्हाड - jitendra awhad news
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाण्यात आलेत. हेलिकॉप्टरने ठाण्यात आल्यानंतर त्यांचे स्वागत करत वाहन चालवण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले.
शरद पवारांचे सारथी झाले जितेंद्र आव्हाड
या वेळी जितेंद्र आव्हाड यांचे मित्र कन्हैय्या कुमार हे देखील बंगल्यावर सोबत होते. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत देशातील परिस्थितीवर गप्पा मारल्या. गुरुवारी दिवसभरात शरद पवार हे मुंब्रा येथे रॅली काढून जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा - भाजपमध्ये बंडाळीची लाट; विद्यमान आमदारांसह 2 जिल्हाध्यक्ष युतीविरोधात निवडणुकीच्या रिंगणात