महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेट एअरवेज कंपनीचा गजब कारभार; प्रवाशांना मनस्ताप - dombiwali

दीड महिन्यांपूर्वी उन्हाळ्यातील सुट्टीचे नियोजन करून मुंबई ते इंदौर असे विमान प्रवासाचे परतीचे तिकीट बूक केले होते, यापूर्वी जेट एअरवेज कंपनीच्या विमानाने प्रवास केला, त्यावेळी त्यांची सेवा चांगली असल्याने यंदा तिकीट बुकिंग केले होते.

जेटने केले अचानक विमानाचे तिकीट रद्द

By

Published : Mar 30, 2019, 9:30 PM IST

ठाणे - जेट एअरवेज कंपनीच्या विमान प्रवासामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे विमानाच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट कंपनीकडून अचानक रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांनी 'ईटीव्ही भारत'कडे मनस्तापाबद्दल चीड व्यक्त केली.

जेटने केले अचानक विमानाचे तिकीट रद्द


डोंबिवली येथील रहिवासी आभा काळे म्हणाले, दीड महिन्यांपूर्वी उन्हाळ्यातील सुट्टीचे नियोजन करून मुंबई ते इंदौर असे विमान प्रवासाचे परतीचे तिकीट बूक केले होते, यापूर्वी जेट एअरवेज कंपनीच्या विमानाने प्रवास केला, त्यावेळी त्यांची सेवा चांगली असल्याने यंदा तिकीट बुकिंग केले होते, मात्र अचानक आम्ही जेट एअरवेज विमान प्रवासाच्या संकेतस्थळावर पाहिले असता, आमच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट बुकिंग अचानक रद्द झाल्याचे दिसले. यामुळे ऐनवेळी काय करायचे? असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला.


आभा काळे यांचे माहेर इंदौर असल्यामुळे त्या माहेरी जात असतात. विमानाने प्रवास सुखकारक व जलद गतीने होत असल्याने त्या नेहमी या मार्गावर प्रवास करतात. मात्र, पहिल्यांदा विमान प्रवासाचे परतीचे तिकीट कंपनीकडून रद्द करण्यात आल्याने खूपच मनस्ताप सहन करावा लागला. ते म्हणाले, माझ्या सारख्या अनेक प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला असेल. अचानक विमान तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना काय मनस्ताप होतो याची कल्पना जेट एअरवेज कंपनीला नसावी का? असा प्रश्नही काळे यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details