ठाणे : शहापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसाठी गेल्या 25 वर्षांपासून शहापूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी शासनाकडे पत्र व्यवहार करून अंदोलन करत आहेत. परंतु शासन यावर नेहमी दुर्लक्ष करत असल्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या निषेधार्थ रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती आज खालावली आहे. मात्र, २४ तास उलटूनही शासनाचा एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकला नसल्याने सोमवारी ५ डिसेंबर रोजी शहापूर बंदची हाक रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने दिल्याने आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेंबाच्या स्मारकसाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
25 वर्षांची मागणी : शहापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबडेकर चौक असून या चौकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास शासनाकडे तब्बल पंचवीस वर्षे पत्र व्यवहार करून विविध मार्गाने अंदोलन करण्यात येत आहे. मात्र, शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यास परवानगी का देत नाही ? हा प्रश्न संपूर्ण डॉ. आंबडेकर जनतेला पडला असून समाजाला अस्वस्थ करत आहे. आता मात्र, रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेकडून आमरण उपोषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्ध पुतळा स्थापनेची मागणी करण्यात आली आहे.