महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा वाद प्रदेश समितीकडे - ठाणे राष्ट्रवादी बातमी

राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु ही कारवाई पक्षाच्या दृष्टीने असंवैधानिक व नियमाला धरून नसल्याचे सांगत, प्रदेश सरचिणीस माजी मंत्री नसीम सिद्दीकी यांनी तिनही पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द केले आहे.

internal-dispute-between-thane-ncp-goes-to-state-committee
भिवंडी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा वाद प्रदेश समितीकडे

By

Published : Oct 26, 2020, 5:02 PM IST

ठाणे -जिल्हा अध्यक्ष भगवान टावरे यांनीभिवंडी शहर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जावेद फारुकी, ईवाद नोमानी व हारुन खान यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई केली होती. परंतु ही कारवाई पक्षाच्या दृष्टीने असंवैधानिक व नियमाला धरून नसल्याचे सांगत, राष्ट्रवादीच्या शिस्त पालन समितीचे सदस्य तथा प्रदेश सरचिणीस माजी मंत्री नसीम सिद्दीकी यांनी तिनही पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द केले आहे. यामुळे भिवंडीतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे.

प्रदेश सरचिणीस माजी मंत्री नसीम सिद्दीकी यांची प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वीच भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष भगवान टावरे यांनी तिन पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी भूमिका व पक्षाच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप करत पदावरून निलंबित केले होते. तसा निर्णय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला होता. यावर निलंबन मागे घेण्यासाठ जावेद फारुकी, हारुन खान यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भिवंडी निरीक्षक माजी मंत्री नसीम सिद्दीकी यांच्याकडे धाव घेतली होती. अध्यक्ष भगवान टावरे यांनी केलेले निलंबन हे पक्षाच्या नियमानुसार नसल्याचे सांगत त्यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची गंभीरतेने दखल घेत नसीम सिद्दीकी यांनी निलंबनाची कारवाई रद्द केली. त्यामुळे तिनही पदाधिकारी आपआपल्या पदावर कायम राहणार आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी स्थापनेपासून महाराष्ट्राच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्ष तत्कालीन युती सरकारच्या काळात ५ वर्ष सत्तेविना राहिल्याने अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला गेल्या ५ वर्षाच्या काळात रामराम केल्याचे पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा सत्तेवर येताच स्थानिक पातळीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत राजकारण सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

शिस्त पालन समितीकडे तक्रार करा - नसीम सिद्दीकी

जिल्हा अध्यक्ष यांना कुठल्याही पदाअधिकारी व कार्यकर्त्याच्या विरोधात तक्रारी असतील तर, पक्षाच्या शिस्त पालन समितीकडे त्या पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली पाहिजे. या समितीत पाच सदस्य असून समितीचे अध्यक्ष माजी मंत्री दांडेगांवकर आहेत. या समितीकडे तक्रार केल्यास पक्षातील दोन्ही पदाधिकाऱ्यांना एकत्र बसून तक्रार ऐकल्यानंतर संबधित निर्णय प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविण्यात येतो. त्यांच्या निर्देशानुसार संबंधित पदाधिकारी अथवा कार्यकर्ता यांच्यावर निलंबनाची कार्रवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details