नवी मुंबई - सौदी अरेबियावरून परत येऊन कॉरेन्टाईनचा शिक्का असूनही गावी पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या १३ संशयितांना पकडण्यात आले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या १३ जणांची रवानगी नवी मुंबईतील विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे.
हे १३ जण उत्तरप्रदेशला जाण्याच्या तयारीत होते. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीला आला. हे तेरा जण मुंबई विमानतळवरून खासगी टॅक्सीने नवी मुंबईमध्ये आले होते. त्यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का होता. १३ पैकी एकाचे घर नवी मुंबईमध्ये असल्याने ते एक रात्र त्याच्या घरात राहून दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशला रेल्वेने जाणार होते.
कॉरेन्टाईनचा शिक्का असूनही पळून जाणाऱ्या 13 संशयित ताब्यात हेही वाचा -भारतात कोरोनाचे १९५ रुग्ण; महाराष्ट्र आणि केरळात सर्वात जास्त फैलाव
हे संशयित नागरिक रात्री नवी मुंबईमध्ये आल्यावर सतर्क नागरिकांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्यांच्या हातावर शिक्के सापडले. याबाबत तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांना विलगीकरण केंद्रात हलवण्यात आले. हे १३ जण सौदी अरेबियामध्ये कामाला होते, तेथून ते परत भारतात आले होते.
आत्तापर्यंत नवी मुंबईमध्ये ५२ लोकांना होम कॉरेन्टाईन केले आहे. नवी मुंबईमध्ये आलेल्या तीन फिलिपीयन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.